Tuesday, June 22, 2010

वादळ-वारे

थोडी आकाशाची लाली

त्यान रात झाकोळली

चन्द्र चान्दण्यान्वरून

जाई काजळाची लाट

थोड नीळ अन लाल

दाटले आहे आभाळ

कधी थोडस वादळ

घाली पावसाचा घाट

कधी प्रकाशाचा झोत

कधी दाटला काळोख

हुन्कारले दिस रात

सन्गे कोकीळेची साथ

2 comments:

  1. चांगली आहे... अशाच आणखी येऊ देत...
    अनुस्वार देताना, M वापरायचं.
    म्हणजे - अजिंक्य लिहिताना, ajiMkya = अजिंक्य.
    अनुस्वाराच्या जागी ’M’... बस्स्स...

    ReplyDelete
  2. आणखी एक गोष्ट...
    ब्लॊगवरच्या कमेंट्स पब्लिश होण्याआधी, त्यांचं मॊडरेशन करत जा.
    त्यासाठी सेटिंग्स बदल. ज्यामुळे कमेंट आली, की आधी ती फ़क्त तुलाच
    दिसेल, आणि तू मंजूर केलीस, तर मग ब्लॊगवर दिसेल.
    सेटिंग बदल, आणि मग मला सांग, म्हणजे मी टाकीन एखादी कमेंट...

    ReplyDelete